अमळनेरात वाळू चोरी होत असतांना सामान्य जनतेला दिसते, मग प्रशासनाने कोणती पट्टी बंधिलीये डोळ्याला ?
हप्ते नसल्याने ट्रॅक्टर पकडले…चर्चांना उधाण

अमळनेर : तालुक्यात वाळू चोरी होत असल्याचे सर्वांना दिसत आहे. सर्वसामान्य जनता वाळू चोरी थांबवण्याची मागणीही करीत आहे. तालुक्यात वाळू चोरी होत असल्याचे सामान्य जनतेला दिसतंय तर मग प्रशासनाने नेमकी कोणती पट्टी डोळ्यांना बांधली आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
तालुक्यात वाळूमुळे अनेक मोठ्या घटना याआधी घडल्या आहेत. कायदा सुव्यवस्था खराब होण्याच्या मार्गावर असते. मात्र तरीही वाळूच्या बाबततीत प्रशासन सुस्त झोपेत आहे.
पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते किंवा सामान्य जनता यांनी तक्रारीठी तहसीलदारांना फोन केला तर कारवाई सुरू आहे असे खोटे बोलून तहसीलदार पळ काढत असतात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.
गेल्या रात्री एक ट्रॅक्टर तहसीलदार व त्यांच्या टीमने पकडले होते. मात्र त्या आधी पकडलेले दोन ते तीन ट्रॅक्टर सोडून देण्यात आले व या ट्रॅक्टरचे हप्ते नसल्याने हे ट्रॅक्टर जमा झाल्याची चर्चा तालुक्यातील कट्ट्या – कट्ट्यांवर सुरू आहे. जर ही चर्चा खरी असेल तर तालुका कोणत्या दिशेने जातोय याचा शोध घेणे गरजेचे आहे. आणि जर खोटे असेल तर तहसीलदार यांना कारवाईसाठी कोणता मुहूर्त सापडेल हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील तिन्ही प्रमुख नद्यांमधून शेकडो ट्रॅक्टर / डंपर रोज अवैध वाळू वाहतुक करीत आहेत. याकडे प्रशासन कधी लक्ष देईल हे पाहणे गरजेचे आहे. वाळू चोरीच्या बाबत अजून एक गावाचा समावेश झाला असून तेथील माजी सरपंच व विद्यमान पोलीस पाटीलच अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे.
टीप – हप्तेबाबत दिव्य लोकतंत्र किंवा संपादक मंडळ पुष्टी करीत नाही.
