फापोरे – मंगरूळ रस्त्यावर शेकडो ब्रास वाळूचा ढीग….
वाळू जप्त करून कारवाई व्हावी… शेतकऱ्यांची मागणी

अमळनेर : तालुक्यात वाळूबाबत मोठा आवाज उठत असतांनाच अनेक ठिकाणी वाळू माफियांनी वाळूचे ढीग लावून ठेवले असल्याची माहिती येत होती. मात्र आज दिव्य लोकतंत्रने शोध मोहिम घेतली असता या बाबत पुरावे देखील मिळाले आहेत.
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ते फापोरे रास्तावर तब्बल शेकडो ब्रास वाळू अवैध उपसा करून वाळू माफियांनी साठवून ठेवली आहे. मंगरूळ ते फापोरे रास्तावरील अनन्या पोल्ट्री फार्म समोर ही अवैध वाळू पडून आहे. या रस्त्यारून फापोरे व फापोरे येथून मंगरूळ, अमळनेरच्या दिशेने लोकं जा ये करतात, यात महसूल कर्मचारी म्हणजेच संबंधित सजेचे तलाठी असून देखील रस्त्यालगत असलेल्या वाळूवर त्यांच्या लक्ष जात नसेल का ? किंवा त्यांचे कोतवाल आणि इतर लोकं त्यांना माहिती देत नसतील का असा सवाल उपस्थित होतो.
फापोरे गावालगत असलेल्या बोरी पत्रात देखील वाळू चोरी होत असून त्याकडे देखील प्रशासनाचे लक्ष नाही.
