अमळनेरात अवैध वाळू उपसावर प्रशासन मेहरबान….?
कोण घालतंय वाळूमाफियांना पाठीशी?

अमळनेर : तालुक्यात अवैध वाळू उपसा जोरात सुरू असून प्रशासन वाळू माफियांवर मेहरबान असल्याचे दिसत आहे लोकप्रतिनिधिंमुळे प्रशासन वाळू माफियांना चांगलंच पाठीशी घालत असल्याचेही दिसते.
अमळनेर तालुक्यातील बोरी नदी वरील हिंगोणे, तापी वरील जळोद, सावखेडे, पांझरा वरील मांडळ यांसारख्या गावांमधून शेकडो ब्रास वाळू रोज चोरीस जात आहे, मात्र प्रशासन डोळ्यांना काळी पट्टी बांधून बसले आहे.
आधी रात्रभर वाळू वाहतूक चालत असते तर आता मात्र दिवसा देखील वाळू वाहतूक सुरू असते.
जळोद तापी पत्रातून एका लोकप्रतिनिधीचे डंपर व कार्यकर्ते रोज अवैध वाळू वाहून नेत आहेत. यात जळोद, अमळगाव, हिंगोणे येथील वाळू माफीये सक्रिय आहेत. त्या लोकप्रतिनिधीच्या काँक्रीट प्लांट वर ही वाळू जात असल्याची खात्रीशीर माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे. जर स्वतः लोकप्रतिनिधी अवैध वाळू वाहतुक करीत असतील तर मग इतर लोक कुणाला घाबरणार आहेत असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत.
दरम्यान स्वतः एक लोकप्रतिनिधी अवैध वाळू वाहून नेत असल्याने इतरांना कसे बोलावे असा सवाल आता प्रशासनासमोर उभा आहे. तर आम्ही जर कारवाई केली तर आमचीही बदली होईल किंवा त्रास होईल असाही धाक अधिकाऱ्यांमध्ये आहे.
तर तुम्हीही खा आणि मलाही खाऊ द्या म्हणजेच ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’अशी सेटिंग वाळू माफियांसोबत लोकप्रतिनिधीची झाली असल्याचे समजते. कारण कुणाचा हात व सहकार्य असल्याशिवाय एवढी मोकडी वाळू वाहतुक चालूच शकत नाही हे देखील तेवढेच खरे मानावे लागेल !
