बाहेर ना पत्र ना निर्णयाची प्रत तरी पाडळसे धरणाला पीआयबीची मिळाली मान्यता ?

0

अमळनेरच्या राजकारण्यांना निवडणूका तोंडावर येताच का येते पाडळसे धरणाची आठवण ?

 

अमळनेर : तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाडळसे धरण आहे. अनेकांनी या धरणावर मते मागत पदे मिळवलीत. मात्र असे करत फक्त आणि फक्त जनतेला वेड बनवण्यात राजकारणी यशस्वी झाले आहेत. आताही आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर राजकारणींनी फुसका फटाका फोडला असल्याचे दिसते. तो म्हणजे पाडळसे धरणाला पीएमकेएसवाय अंतर्गत पीआयबीची मान्यता मिळाली आहे. व ही बैठक संपन्न होत नाही तोवरच 859 कोटींची मदत केंद्र सरकार कडून मंजूरही झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

जनतेला ह्या विषय पूर्णपणे वेड बनवलं जात आहे. कारण केंद्र सरकार 2024 मध्ये स्थापन झाल्यापासून सुमारे एका वर्षात पीआयबीची गुरुवारी पहिलीच बैठक संपन्न झाली. यात पाडळसे धरणाचा विषय घेण्यात आल्याची माहिती आहेच, पण यात फक्त एवढीच चर्चा झाल्याचे समजते की पाडळसे धरणाला पीएमकेएसवाय मध्ये समावेश करण्यात काहीही हरकत नाही. मात्र याचे सर्व इतिवृत्त हे सोमवारी बाहेर निघणार आहे.

पाडळसे धरणाला पीएमकेएसवाय मध्ये समाविष्ट करण्याचा फक्त मार्गच मोकळा झाला असून समावेश मात्र अजून झालेला नाही. तर 859 कोटी रुपयांचा विषय दूरच आहे असे समजावे. कारण याच निर्णयावर सुमारे डझनभर सचिव व डझनभर इतर लोकांच्या सह्या बाकी आहेत. त्या सह्या झाल्यानंतरच पुढे विषय होऊ शकतो, ह्या सह्या व्हायला सुमारे 10-15 दिवस लागू शकतात असे समजते. तर ह्या नंतर पुन्हा बैठक होईल व केंद्र सरकारने किती पैसे द्यावेत यावरही अजून चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

मात्र एवढं सगळं माहीत असतांना अमळनेर मधील पुढारी हे फक्त आणि फक्त निवडणूकीचा विचार करून जनतेला भूलथापा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तर गेल्या काही वर्षांपूर्वी देखील 1500 कोटी मंजूर झाल्याच्या बातम्या व मोठमोठे बॅनर अमळनेरात झळकले होते. मात्र ते पैसे कुठपर्यंत पोहचले हे अद्याप कोणीच सांगू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!