अमळनेर मधील निकृष्ट कामांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्यसरकार दखल घेणार ?
आमदार अनिल पाटलांच्या कामांवर असलेल्या संशयामुळे अडचणी वाढण्याची शक्यता

अमळनेर : मतदार संघासह तालुक्यातील झालेल्या व होत असलेल्या निकृष्ट बांधकामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र सरकार दखल घेणार आहे. तर आमदार अनिल पाटील यांच्या कंपनीने केलेली कामं ही देखील निकृष्ट असल्याचा संशय निर्माण होत असून आमदार पाटील यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आमच्या सुत्रांनी वर्तवली आहे.
दिव्य लोकतंत्रने गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात होत असलेल्या निकृष्ट कामांबाबत बातम्यांचा धडाका लावला आहे. या बातम्या राज्यातील अनेक मंत्री, आमदार व राज्य सरकार मधील जबाबदार मंत्र्यांना पाठवण्यात आल्या होत्या. त्यानुसार अमळनेर तालुक्यातील कामांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ठेकेदारांना राष्ट्रवादीत स्थान नाही…. अजित पवार
जे ठेकेदार असतील त्यांनी तिकिटे मागू नये व महत्वाच्या पदांवर देखील राहू नये. “एक तर ठेकेदारी एक तर पद यातून एकच निवडा” असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केलं होतं, त्यानुसारही माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या अडचणी वाढण्याची दाट चिन्हे
आहेत.
