कामं माझीच अन् डांबर व काँक्रीट प्लांट, कार्यकर्त्यांनो तुम्ही फिरा रिकामे सांड…
आमदार अनिल पाटलांचे अनेक ठिकाणी स्वतःच्या नावे ठेके…

अमळनेर : नेता हा कार्यकर्त्यांचा रोजगार निर्माता व पोशिंदा असतो. याची उदाहरणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. अजित पवारांच्या बारामतीत व अनेक ठिकाणी त्यांनीं व अनेक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले. मात्र अमळनेर मध्ये हे काही अंशी दिसत नाही. याच्या विपरीत होतांना दिसत आहे. कारण अमळनेरचे आमदार तथा माजी मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या आर.बी.पाटील कन्ट्रक्शन कंपनीच्या नावे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांचे तसेच अनेक कामांचे ठेके घेतले आहेत. तर या कामांवर त्यांच्याच कंपनीचे डांबर व काँक्रीट देखील वापरले जाते आहे.
आमदार अनिल पाटील यांची अनेक वर्षांपासून खडी मशीन आहे. व काही दिवसांपूर्वी त्यांनी डांबर व काँक्रीट प्लांट देखील सुरु केल्याची माहिती आहे. खडी मशीन स्वतःची असल्याने खडी, कच, मुरूम यांसारख्या अनेक बांधकामात वापरण्यात येणाऱ्या वस्तू त्यांच्याच प्लांट वरून जात असतात.

आमदार असल्याने कामांसाठी निधी आणणारे देखील अनिल पाटील, ती कामे करणारे देखील तेच, तेथे लागणारा माल पुरवठा करणारे देखील तेच मग कार्यकर्त्यांनी करावे तरी काय ? असा सवाल अनेक कार्यकर्ते उपस्थित करीत असून काही कार्यकर्ते आमदार पाटील यांची साथ देखील सोडण्याच्या तयारीत असल्याचे देखील बोलले जात आहे.
काही जवळचे कार्यकर्ते तसेच नातलग यांना आमदार पाटील यांनी ठेके दिले आहेत. तर काही जवळचे कार्यकर्ते त्यांच्या नावे अवैध वाळू वाहतूक तसेच इतर व्यवसाय सुद्धा करीत आहेत.
मात्र इतरांच काय काय ?
दरम्यान मिच करणार कामे व माझाच वापरणार मुरूम, डांबर व काँक्रीटचा प्लांट…. तुम्ही फिरा मात्र रिकामटेकडे सांड…..! असं म्हणण्याची वेळ आली असल्याचे अनेकांचे मत आहे.
