लोकसहभागातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडे स्वतःच्या पार्किंगमध्ये जागा कमी पडते एवढ्या गाड्या…
निवडणूकीत लोकसहभागात पैसे गोळा करणे स्टंट होता का?

अमळनेर : तालुक्यात गेल्या काही वर्षांपूर्वी निवडणूकीत जनतेकडून पैसा गोळा करून निवडणूक लढवली, निवडूनही आले, मात्र काही वर्षातच कुबेराने काय जादू केली की, चक्क आपल्या पार्किंग मध्ये गाड्या लावायला जागाच नाही, एवढ्या गाड्या घेतल्या जातात…..
ही कहाणी आहे अमळनेर मधील एका बड्या पुढाऱ्याची / लोकप्रतिनिधीची…. अमळनेर तालुक्यात गेल्या काही वर्षांपूर्वी रंगतदार निवडणूक संपन्न झाली होती. यात विद्यमान लोकप्रतिनिधीचा पराभव करत नवीन लोकप्रतिनिधी निवडून आले. मात्र यात या लोकप्रतिनिधीने संपूर्ण तालुक्यात लोकसहभागाची झोळी फिरवली होती. अनेक लोकांकडून मदतही मागवली होती. मात्र या गोष्टीला काहीच वर्ष उलटले व आज त्यांच्याकडे कुबेराची चांगलीच धनवर्षा झाली आणि स्वतःच्या पार्किंग मध्येही जागा अपूर्ण पडते एवढ्या गाड्या आल्या. जगात अव्वल व अतिमहागडी अशी गाडी देखील त्यांनी घेतली असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. निवडणूकीत जनसहभाग मिळवणे किंवा पैसे जमा करणे हा फक्त पब्लिसिटी स्टंट होता का असा प्रश्न सध्या जनता विचारू लागली आहे.
तर आता मुंबईत व्हीआयपी भागात घर, कंपन्यांचे विस्तारीकरण देखील झाले असल्याचे समजते.
कुबेराची अशीच धनवर्षा तालुक्यातील सर्व नागरिकांवर होवो हीच कुबेरचरणी प्रार्थना !
