आमदार अनिल पाटील यांचे दोन नंबर वाल्यांबाबत शब्द ठरले फोल….?
तालुक्यात दोन नंबरचे धंदे वाढले ; काही धंदे आमदार पाटलांच्या कार्यकर्त्यांचे ?

अमळनेर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या नंतर आपल्या विजयी रॅलीच्या सांगता सभेत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी दोन नंबरच्या धंदे वाल्यांना सूचक इशारा दिला होता. यात आमदार पाटील म्हटले होते की, दोन नंबर वाल्यांनो व रेतीच्या गाड्यावाल्यांनो तुमच्या रेतीच्या गाड्या जरा सांभाळून वापरा, तालुक्यात जर बोगस दारु विकायची हिम्मत केली तर तुमचा बाप याठिकाणी बसलाय ! असा इशाराच आमदार पाटील यांनी यावेळी दिला होता.
मात्र आता निवडणूकीस सहा महिने होत नाही तोवरच तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. याकडे आमदार पाटील यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. आमदार पाटील यांच्याच कार्यकर्त्यांचे सट्टे, दारू व वाळूची वाहने सुरू असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला देखील घाबरवून सोडले असल्याची चर्चा आहे.
रोज होतेय वाळूची अवैध वाहतूक

तालुक्याला लागून तीन नद्या आहेत. तिघांना सध्या पाणी नसल्याने वाळू उपसा जोरात सुरू आहे. तालुक्यातील पांझरा, तापी व येवढेच नाही तर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या बोरी नदीतून सुद्धा अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे. यात आमदार अनिल पाटील यांचे कार्यकर्ते जास्त आहेत.
तापीतुनही रात्री वाळूचा मोठा अवैध उपसा
जळोद गावाजवळ तापी नदी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून हे काम स्वतः एका लोकप्रतिनिधी करीत असल्याची जनतेत चर्चा आहे. त्यांच्या कामावर ही वाळू जात असून हा खेळ फक्त रात्रीच चालत असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित प्रशासन देखील या बाबत घाबरून असून कारवाई करण्यास तयार असल्याचे दिसून येते.
मोठं – मोठ्या टेकड्या झाल्या भुईसपाट
अमळनेर शहराच्या लगत तसेच तालुक्यात असलेल्या टेकड्या भुईसपाट झाल्या असून माफिया लोकांनी तेथून मुरूम चोरून नेला आहे. या बाबत तालुका प्रशासनाकडे काहीही उत्तरे नाहीत. हेडावे गावालगत असलेल्या टेकडी बाबत तहसीलदार यांना वारंवार विचारून देखील तेथील कुठलीही माहिती त्यांच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे.
चारही बाजूंना दारूची विक्री
आमदार पाटील यांनी दारू वाल्यांना विशेष इशारा दिला होता मात्र अमळनेरच्या चारही बाजूंना व अनेक ठिकाणी सोडा विक्रीच्या नावाने दारू विक्री जोरात सुरू असून याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. दारूच्या व्यसनाने अनेक तरुण वाया जात आहेत.
भर बाजारात सट्टे….
अमळनेर शहर व मोठ्या गावांमध्ये भर बाजारात सट्टा जोरात सुरू आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाहीये. अमळनेर शहरातील मच्छी मार्केट, आठवडे बाजार, 123 च्या व्यापारी संकुला जवळ, चोपडा नाका, सुभाष चौक, मारवड, मांडळ, मुडी, झाडी, देवडी, पातोंडा, सावखेडे, अंमळगाव अशा अनेक ठिकाणी सट्टे जोरात सुरू आहेत.
म्हणून आता आमदार अनिल पाटील यांनी “बोले तैसा चाले” या प्रमाणे दोन नंबरचे धंद्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी एवढेच !

2 नंबचे धंदे जर त्यांचे कार्यकर्ते चे असतील तर विद्यमान आमदार काय लक्ष देतील म्हणून पाहिले बोलुन नाही तर करून दाखवीच मग बोलायचं करात फक्तं गाडीत बसून विकास होत नाही विकार करणाऱ्या साठी लोकांन पर्यंत पोहोचावं लागत पण विद्यमान आमदार ना तालुक्या साठी वेळच नाही कोणी कार्यकर्ता गेले ऑफिस ला की सांगता साहेब मुंबई गेले आहे तालुक्यात काम होत नाही मग साहेब मुंबई ला का जातात विद्यमान आमदार नी आजुन 7 वर्षात आमसभा का घेतला नाही कारण आम्हाला काही करायचं नाही