भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली अमळनेर पंचायत समिती…
अनेक योजनांच्या नावे पैशांची मागणी

अमळनेर : पंचायत समिती सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून यात अनेक अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. अनेक योजनांच्या नावे जनतेकडून पैसे उकळले जात आहेत. एवढे पैसे द्या, योजना मंजूर करुन देतो. अशी मागणी सध्या जोरात सुरू आहे.
यात प्रामुख्याने विहीर सिंचन, घरकुल या योजनांसाठी पैसे घेतले गेले आहेत व आजही घेतले जात आहेत. अनेक ग्रामसेवक यात मध्यस्थ भिमिका बजावत आहेत. गट विकास अधिकाऱ्यांच्या नावे बिनधास्तपणे उकळणी सुरू असून याकडे कोणी लक्ष देईल का असा सवाल उपस्थित होत आहे.
