स्वतःला एकनिष्ठ सांगत स्टॅम्प लिहिणाऱ्यांचा शरद पवारांना राम-राम
तिलोत्तमा पाटील व तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
अमळनेर : विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी स्वतःला एकनिष्ठ म्हणत स्टॅम्प बनवून देणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांनी शनिवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत. हा प्रवेश होईल याबाबत दिव्य लोकतंत्रने वृत्त देखील प्रकाशित केले होते. त्यानुसार शनिवारी अमळनेर मधील ह्या प्रमुख दोघांचा प्रवेश झाला.
तिलोत्तमा पाटील व सचिन पाटील हे दोघे शरद पवार यांना देव मानत असे. तर आम्ही कायम एकनिष्ठ आहोत असे स्टॅम्प देखील यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला करून दिले होते. मात्र आज त्यांच शरद पवारांच्या विरोधात जाऊन बसने म्हणजे याला काय म्हणावे व आता एकनिष्ठता कुठं गेली असाही प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहेत.
तिलोत्तमा पाटील यांना शरद पवारांनी अनेक संधी दिल्या आहेत. तर अनेक पदे देखिल त्यांनी भोगली आहेत. तालुक्यावरून राज्यापर्यंत त्यांना शरद पवार यांनी संधी दिली आहे. तर जेव्हा राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले तेव्हा दुसऱ्या गटाला गद्दारसह इतर उपमा त्या द्यायच्या… मग आता ह्या कोण ? असा सवाल अनेक बुद्धिजीवीनी विचारला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार यांच्या कडून तात्कालिन उमेदवार तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या विरोधात तिलोत्तमा पाटील व सचिन पाटील यांनी प्रचार केला होता. तर आता आगामी नगर परिषद निवडणूकीच्या तोंडी स्वार्थापोटी या दोघांचा प्रवेश असल्याचे बोलले जात आहे.