शरद पवारांच्या राष्ट्रवादीस अमळनेरात मोठी सुरंग….
राष्ट्रवादी – SPचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह अनेक पुढारी राष्ट्रवादी – AP व भाजपच्या गळाला
अमळनेर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर अमळनेर येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीस मोठी सुरंग लागली असून यातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह अनेक बडे पुढारी माजी मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार या पक्षात व भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर काही पुढारी आहेत. राष्ट्रवादीचा येत्या 3 तारखेला तर भाजपाचा लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी तिलोत्तमा पाटील, रिटा बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह अनेक लोक माजी मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिनांक 3 मे रोजी प्रवेश करणार आहेत.
तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यांचे तसे भाजपा वरिष्ठांशी बोलणे झाल्याची देखील माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे.
या प्रवेशांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत मोठे बदल दिसणार असून अनेकांच्या आशा जिवंत होतील तर अनेकांच्या मावळणार देखील आहेत.
तर अमळनेर बाजार समितीत देखील मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे.