मुख्याधिकारी साहेब नगर परिषदेचे तानाशाह होऊ नका….

0

ऑनलाइन चेहरा ओळख हजेरी कामगार नाकारताय, मग आपण का एवढा अट्टाहास धरताय ?

 

अमळनेर : नगर परिषदेच्या कामगारांसाठी सध्या अनेक हजेरी पद्धत सुरू असल्याचे वृत्त दिव्य लोकतंत्रने गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते. त्या नंतर नगर परिषद कामगार संघटनांनी ऑनलाइन ऍपद्वारे चेहरा ओळख करून होणारी हजेरी पद्धत बंद व्हावी यासाठी निवेदने दिली होती. मात्र अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी ही पद्धत बंद न करण्याचे सांगितले. मी हे बंद करणार नाही या बाबत मी लागल्यास लेखी देतो असे म्हणत तानाशाही करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमच्या सूत्रांनी सांगितले आहे.

कोणतीही योजना अथवा नियम हे दोन्ही बाजूंच्या चांगल्यासाठी असायला हव्यात. मुख्याधिकारी नेरकर यांच्या नुसार एक प्रकारे ऑनलाइन चेहरा ओळख योग्य आहे. मात्र कामगारांसाठी हे बिलकुल योग्य नाही. कारण या हजेरी मुळे कामगारांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून कामगार या हजेरी पद्धतीस विरोध करीत आहेत.

कामगारांचा विरोध असूनही ऑनलाइन चेहरा ओळख सुरू ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी ?

ही हजेरी पद्धत बंद व्हावी यासाठी कामगार संघटनांनी निवेदने दिली होती. व या पद्धतीच्या विरोधात भूमिका देखील अनेकांनी घेतली आहे. तरी देखील मुख्याधिकारी तुषार नेरकर या हजेरी पद्धतीच्या समर्थनार्थ का आहेत ? या बाबत अभ्यास करणे गरजेचे आहे. व ह्या हजेरी पद्धतीचे ऍप बनवणारी कंपनी कोणाची आहे व त्याचा नेमका संबंध कुणाशी आहे, याने मुख्याधिकारी साहेबांचा काही वैयक्तिक फायदा आहे का ? याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुढील वृत्तात वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!