नगर परिषदेची नोटीस जाऊनही काम सुरूच मात्र तरीही कारवाई नाही.
तोंडेचे-तोंड कशाने दाबलंय का ?
अमळनेर : शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळल्याचे प्रकरण घडले होते. त्या नंतर अमळनेर नगर परिषदेने संबंधित बांधकामाच्या मालकास काम बंद ठेवण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र तरीही संबंधित मालक व ठेकेदार यांनी हे काम सुरूच ठेवले आहे. वरच्या मजल्याचा स्लॅब देखील टाकला गेला आहे. अमळनेर नगर परिषदेच्या टाऊन प्लॅनिंग विभागाचे अभियंता श्री तोंडे यांना या बाबत कळवण्यात आले होते. मात्र आम्ही यात काहीही करू शकत नाही, नोटीस दिली गेली आहे आमचा विषय संपला आहे असे त्यांनी म्हटले होते. म्हणून संबंधित ठेकेदाराने दम देऊन किंवा इतर काही देऊन तोंडेचे तोंड दाबले आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजीचा फोटो