अमळनेर पोलिसांनी पकडला वाहनासह सुमारे 18 लाखांचा गांजा
बोलेरो गाडीत मिळाला 56 किलो गांजा

अमळनेर : पोलीसांनी शुक्रवारी रात्री सुमारे 19 लाख 39 हजार 400 रुपयांचा बोलेरो वाहनासह 56 किलो गांजा पकडण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत दोघांना ताब्यातही घेण्यात आले असून ही कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार तालुक्यातील जडोद मार्गाने अमळनेर शहराच्या दिशेने गांजा घेऊन बोलेरो गाडी येत आहे. याची संपूर्ण खात्री करून अमळनेर पोलिसांचे पथक अमळनेर शहरात बाहेर नजर ठेवून होते. समोरुन येणारी बोलेरो वाहन गांजा घेऊन येणारेच आहे, याची संपूर्ण खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यास थांबण्यास सांगितले व वाहन थांबल्या नंतर त्यात गांजा मिळून आला. जागेवरच पंचनामा झाल्यानंतर 18 पॅकिंग मध्ये सुमारे 56 किलो गांजा त्या वाहनात मिळून आला आहे. दरम्यान पोलिसांनी वाहन, गांजा व दोघांना ताब्यात घेतले असून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.