मुजोर ठेकेदाराची मुजोरी….
अमळनेर शहरातील टिपी 27वर सुरू असलेल्या निकृष्ट बांधकामाचा स्लॅब कोसळला
मुजोर ठेकेदाराकडून परिसरातील नागरिक व पत्रकारांनाही धमक्या
अमळनेर : शहरातील नर्मदा वाडी टाऊन प्लॅनिंग नंबर 27 वर सुरू असलेल्या बांधकामाचा गुरुवारी स्लॅब कोसळला. यात दुर्दैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही एवढे बरे झाले. मात्र बांधकाम कोसळल्याने चिंतेत असलेले परिसरातील नागरिक व बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना बांधकामाचा मुजोर ठेकेदार नरेश चौधरी हा धमक्या देत होता.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल समोरील नर्मदा वाडीतील टीपी नंबर 27 वरील बांधकाम सुरू होते. या बांधकामाचा काल गुरुवारी सकाळी स्लॅब कोसळला होता. सुदैवाने याठिकाणी कोणाचीही जीवित हानी झाली नाही. या भागात राहणाऱ्या काही लोकांची लहान मुले याठिकाणी कधी – कधी खेळत असतात. तर शाळकरी तरुण-तरुणी तसेच बँक व दुकानांचे ग्राहक मोठ्या प्रमाणात याठिकाणी ये-जा करीत असतात. हे स्लॅब कोसळल्या नंतर परिसरातील एका नागरिकाने मुजोर ठेकेदार नरेंद्र चौधरी याला जाब विचारला असता त्याने तुझी मुलगी याठिकाणी मेली का असा सरळ सवाल त्या नागरिकाला विचारला. व त्यासोबत हुज्जतही घातली. तर त्याठिकाणी बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना देखील अरेरावीची भाषा करीत पत्रकारांना बदनामी कारक भाषा करीत गावात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे तेथे कोणती सुरक्षा जाळी किंवा इतर साधने आहेत हे दाखवा असे म्हटले. तेथे नाहीत तर मग मी का लावू असे असे अनेक प्रकारे अकलेचे तारे त्याने तोडले आहेत. तसेच तुम्ही जर आमची बातमी लावली किंवा कुठंही अर्ज केला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत अशाही धमक्या त्याने पत्रकारांना दिल्या आहेत.
दरम्यान संबंधित काम निकृष्ट असून या कामाला तात्काळ थांबवावे व त्याची चौकशी करून सुरू असलेले निकृष्ट बांधकाम पाडून नवीन बांधकाम करावे तसेच संबंधित ठेकेदाराचा बांधकाम परवाना रद्द करावा अशी मागणी होत आहे.
तर संबंधित पत्रकारांनी अमळनेर नगर परिषद व अमळनेर पोलीस ठाणे यांना या बाबत पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.