पातोंडा येथील तरुणाची आत्महत्या….
तरुणाचा जीव वाचवण्यात आले होते यश मात्र आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने गेला जीव
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील तरुणाने मंगळवारी संध्याकाळी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आपला मुलगा गळफास लावत असल्याचे त्याच्या नातलगांना समजले. तेव्हा त्यांनी त्यास खाली उतरले. व पातोंडा प्रार्थमिक आरोग्य केंद्रात त्यास नेले. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने व उपचार मिळाला नसल्याने त्या तरुणांचा मृत्यू झाला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील प्रवीण एकनाथ बिरारी (वय 26) या तरुणाने मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाबत त्याचे वडील व भाऊ तसेच इतर नातलगांना समजताच त्यांनी त्यास खाली उतरवून उपचार घेण्यासाठी तात्काळ जवळच असलेल्या प्रार्थमिक अयोग्य केंद्रात नेले. मात्र त्या ठिकाणी शिपाई सोडून इतर कुणीही नसल्याने त्यास उपचार मिळाले नाहीत. डॉक्टरांना संपर्क करून देखील ते आले नाहीत. सुमारे 1 तास त्या ठिकाणी तरुणाचे नातलग डॉक्टरांची वाट पाहत होते. मात्र तरी ना डॉक्टर, ना नर्स आल्या म्हणून त्यांनी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका बोलावून तरुणास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा गावापासून 5 किलोमीटर अंतरावरच जीव गेला. ही सर्व हकीकत दिव्य लोकतंत्रला तरुणाचे वडील व भाऊ यांनी सांगितली.
या आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ आहे. मात्र संध्याकाळी 6 वाजता कुणीच नसेल तर यांना पगार नेमका कशासाठी दिला जातो हा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य केंद्रात 24 तास कर्मचारी असायला हवेत, रुग्णांना तात्काळ प्रार्थमिक उपचार मिळायला हवेत म्हणून प्रार्थमिक आरोग्य केंद्र शासनाने उभारले आहेत. मात्र तरी रुग्णांचे हाल होत असतील तर यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतो.