ट्रॅक्टरच्या धडकेत दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
अमळनेर : पारोळा तालुक्यातील सुमठाणे येथे बुधवारी सकाळी हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सुमठाणे येथे शेतीकामासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील धरमसिंग मेहता यांची दीड वर्षांची चिमुकली शिवानी ही ट्रॅक्टरच्या रोटरच्या धडकेत गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
मेहता कुटुंब हे हातमजुरी करण्यासाठी सुमठाणे येथे १५ दिवसांपूर्वी आले होते. आज बुधवारी सकाळी शेतात काम सुरू असताना शेतमालक अविनाश पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवत होते. ट्रॅक्टरच्या रोटरच्या धक्क्याने चिमुकलीच्या डोक्याला गंभीर मार लागला. तिला तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.