अमळनेरात अवैध धंदे जोमात..
सट्टे, गुटखा तर दारूचाही महापूर ; नूतन पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

अमळनेर : शहरासह तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू असून सट्टे, गुटखा तर जणू दारूचा महापूर वाहत आहे असे भासते, तसेच इतर अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. याकडे अमळनेर पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी व अमळनेर उपविभागाचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी सट्टे, गुटखा, व दारू विकली जाते. तसेच सध्या दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीये.
शहरातील तीनही गुटखा माफीये जोमात आहेत. त्यांचे गोडाऊन मोठ्या प्रमाणात भरलेले असतात. तर पाच ते सहा असलेले सट्टा माफीये देखील जोमात आहेत.
म्हणून याकडे पोलीस प्रशासन व संबंधित इतर प्रशासनांनी लक्ष देण्याची गरज आहे.