आदिवासी संस्कृतीचा उपयोग मनोरंजनासाठी का ?
कृ.उ.बा सभापती अशोक पाटील यांनी उत्तर देण्याची गरज
अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील हे आदिवासी संस्कृतीचा उपयोग फक्त जमवलेल्या गर्दीचे मनोरंजन करण्यासाठी करतात की काय असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात तर आज देखील एका कार्यक्रमात अशोक पाटील यांनी आदिवासी नृत्य करणारे लोकं बोलावले होते. प्रत्येक वेळेस असे करणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित होतोय. आज बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात किती आदिवासी लोकांचा सन्मान करण्यात येतो हे देखील पाहणे गरजेचे आहे. आदिवासी संस्कृतीचा मनोरंजनासाठी वापर न करता त्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. म्हणून सभापती अशोक पाटील यांनी या बाबत माफी मागून उत्तर देणे गरजेचे आहे.
पुढील वृत्त रात्री नक्की वाचा….