अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले
११ मार्च पर्यंत राहणार बारबोले यांच्याकडे पदभार
अमळनेर : पोलीस ठाण्याचा पदभार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक (DySP) केदार प्रकाश बारबोले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ते पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्याकडून कार्यभार स्वीकारून पोलीस ठाण्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतील. बारबोले हे मागील वर्षीच्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्रात सहावी रँक मिळवून पोलीस उपअधीक्षक पद मिळविले होते.
अमळनेर पोलीस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केदार बारबोले हे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक असून नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP विनायक कोते यांनी देखील आताच परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला आहे. म्हणून अमळनेरला दोन्ही अधिकारी हे उच्च पदस्थ मिळाले आहेत.