अवघ्या आठ वर्षात नगर परिषद मुख्य इमारतीस तडे…
मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता; चौकशीची मागणी
अमळनेर : नगर परिषदेच्या मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावर तडे पडले असून ते लवकरात – लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. फक्त सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या या नगर परिषदेस आता पासूनच तडे पडाले असल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची शंका आहे. पावसाळ्यात नगर परिषदेचा पुढील भाग पाण्याने गळणे व आता वरील मजल्यावर पडलेले तडे व इतर बाबी यांमुळे ही इमारत भ्रष्टाचार झाला असल्याच्या शंकांच्या भावऱ्यात आली आहे. दरम्यान या इमारतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी तक्रार दाखल करण्यात येणार आहे.