अमळनेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बालिशपणाचे लक्षण…
तगडा उमेदवार देण्याचा विचार सोडून मलाच उमेदवारी द्या हा अट्टाहास कशासाठी ?
अमळनेर : गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीत इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊगर्दी होती. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस यांच्यात अमळनेर मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच झाली. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात ही रस्सीखेच अंतर्गतच मोठ्या प्रमाणात आजही सुरू आहे. तालुक्यासह संपूर्ण मतदार संघ त्यांचा हा बालिशपणा बघत आहे. एक उमेदवार म्हणतो की, मला तिकीट द्या आणि दुसरा म्हणतो की मला द्या, असे सध्या सुरू आहे.
स्वतः आत डोकावून न पाहता मी निवडणूक जिंकूनच येईल असा भास या लोकांमध्ये कुटून कुटून भरला गेला आहे. आणि हा भास फक्त शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच आहे. त्या वक्तव्यात शरद पवार म्हणतात की, “अनिल पाटील पुढच्या विधानसभेत तुम्हाला दिसणार नाहीत”. या एका वाक्यामुळे मी आमदार होऊनच जाईल असा गैरसमज यांच्यात रूढ झाला आहे.
सध्याच्या काळात विधानसभा निवडणुक लढवण एवढं सोपं राहिलेलं नाहीये. करोडो रुपयांची उलाढाल प्रत्येक निवडणूकीत होते. म्हणून तसे आर्थिक नियोजन व तो व्यक्ती आर्थिक भरगछ असावा लागतो, उमेदवाराचा दांडगा जनसंपर्क असावा लागतो, त्यांचे काम असावे लागते. मात्र यातील दोन उमेदवार सोडून इतरांकडे एकही पात्रता नसतांना यांनी उमेदवारी करण्याची हौस का करावी ? असा सवाल सर्वसामान्य बुद्धिजीवी लोकं उपस्थित करीत आहेत.
या इच्छुक उमेदवारांच्या पैकी काही उमेदवार तीन महिन्यांपूर्वी कुणाच्या प्रेतयात्रा किंवा इतर समारंभात सुद्धा जात नव्हते. मात्र आज गणपती पासून तर नवरात्री पर्यंत तर इतर लहान मोठे कार्यक्रम, गावांमध्ये भेटी- गाठी व सर्वच ठिकाणी भेटी-गाठी करीत आहेत.
यातील काही इच्छुकांची सरपंच, नगरसेवक होण्याची पात्रता नाही मात्र सरळ आमदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.
समोर एक मंत्री तर एक माजी आमदार आहेत, दोन्हींची परिस्थिती सर्व मतदार संघास ज्ञात आहे. मात्र त्यांच्यासमोर उमेदवार कोणता द्यावा किंवा चांगला तगडा उमेदवार द्यावा, हा विचार सोडून मलाच उमेदवारी द्या, हा अट्टाहास कशासाठी हा प्रश्न सध्या जनता विचारू लागली आहे.
उद्या अमळनेर मतदार संघासाठी उमेदवारी घोषित होईल मात्र यात ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्याचा ही लोकं प्रचार करतीलच याची शाश्वती नाहीच. तेव्हा पक्ष यांच्यावर कारवाई करेल हा हा प्रश्न उपस्थित होतो.