अमळनेर येथील इच्छुकांची पुण्यात शरद पवारांकडून चाचपणी…
माजी आमदार साहेबराव पाटील गैरहजर ?
अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उमेदवारांच्या चाचपण्या सुरू केल्या असून आज सोमवारी अमळनेर येथील इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यात अमळनेर येथील अनेक इच्छुक उमेदवार हजर असल्याचे समजते. प्रामुख्याने या इच्छुकांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, राष्ट्रवादी प्रदेश सचिव तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, अमळनेर शहराध्यक्ष श्याम पाटील, नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले तथा बांधकाम व्यावसायिक प्रशांत निकम आदी उपस्थित असल्याचे समजते.
मात्र अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील ज्यांनी काही दिवसांपासून मतदार संघात भेटी गाठी सुरू करत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केला होता तेच साहेबराव पाटील आज पुणे येथे झालेल्या मुलाखतीस गैरहजर असल्याची माहिती खात्रीशीर आमच्या सूत्रांनी दिली आहे. साहेबराव पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काही नेत्यांकडून अंतर्गत विरोध असल्याचे देखील बोलले जात आहे.
तर साहेबराव पाटील यांची याआधीच शरद पवार यांच्याकडून चाचपणी झाली असून त्यांची 20 मिनिटे मुलाखत झाल्याची देखील माहीती आहे. तर या नंतर देखील भेट होणार असल्याचे समजते. असे झाल्यास साहेबराव पाटील यांच्या बाबत नाराज असलेले पुढारी काय पवित्रा घेतात हे पाहणे गरजेचे ठरेल.