अमळनेर प्रांत कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चा
अमळनेर : बाल विकास प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिनांक आज २५ सप्टेंबर रोजी बुधवारी बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या बालविकास प्रकल्पाधिकारी प्रेमलता पाटील व उपविभाग प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार जोशी यांना दुपारी २ वाजता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोर्चाने जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यांत आले. त्यांनी तुमच्या मागण्या रास्त असून त्या शासनास पाठवितोअसे सांगीतले मोर्चाला सामोरे येऊन निवेदन स्विकारले .
मागण्या खालील प्रमाणे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल 2022 पासून सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे ग्रॅज्युटी लागू करा आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन चा जीआर ताबडतोब काढा . तसेच अंगणवाडी कर्मचारी हे अत्यल्प मानधनात काम करीत असून त्यांना त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी ! आदी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून आपला संतप्त भावना व्यक्त केल्या .
मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्षा सौ विद्या पाटील उपाध्यक्षा , श्रीमती भिकु पाटील व सर्व सेविका मदतनीस तसेच भानुदास पाटील संघटक – सचिव यांनी निवेदन दिले .