आपत्तीपूर्वीच व्यवस्थापन: हाच सुरक्षेचा मुख्य पैलू… मनोज मोहोळ यांचे प्रतिपादन

0

प्रताप महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न


अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने “ वनस्पती आणि सुरक्षा: आपत्ती व्यवस्थापनाचा समन्वयवादी दृष्टिकोन ” या विषयांतर्गत एक दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा दिनांक 21 सप्टेंबर रोजी कै. काकासाहेब शंकरराव राणे नाट्यगृहात संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे द्वीप प्रज्वलन करून उद्घाटन मान्यवरांच्या – हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन हे उदघाटन सत्राचे अध्यक्षपदी होते. याप्रसंगी खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक व प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे, उपाध्यक्ष सौ.माधुरी पाटील, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, बीज भाषक प्रा.गिरीश कुकरेजा(नगर), डॉ.उपेंद्र धगधगे ( नंदुरबार), तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळेचे सहाय्यक समादेशक श्री.मनोज मोहोळ व अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.सुनील नंदवाळकर हे उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी उपस्थितांना स्वछता सप्ताह निमित्त स्वच्छतेची शपथ दिली.
आजच्या कार्यशाळेत प्रथम सत्रात व्याख्यान व द्वितीय सत्रात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 23 सदस्य संघाकडून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले,ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.
कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख अतिथी श्री.मनोज मोहोळ, सहाय्यक समादेशक अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांनी आपल्या मनोगतात आपत्तीतून पूर्णपणे स्वतःला वाचवायचे असेल तर आपत्तीपूर्वीच त्याचे व्यवस्थापन हा सुरक्षेचा मुख्य दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी त्यासाठी प्रशिक्षित असणे फार आवश्यक आहे.
निसर्गाचे संरक्षण आणि आपत्ती रोखण्यात वनस्पती शास्त्राची भूमिका या विषयावर विषय तज्ञ प्रा.गिरीश कुकरेजा (न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख यांनी बहुमूल्य स्वरूपाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपत्ती रोखण्यात वनस्पतींची भूमिका फार महत्त्वाची असल्याचे सांगत वनस्पती आपल्याला आपत्तीपूर्व सूचना देत असतात त्या आपण समजून घेणे गरजेचे आहे,असे मत मांडले.

द्वितीय संत्रारंभी एस डी आर एफ धुळे यांच्या संपूर्ण टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. द्वितीय सत्रात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या जवानांनी आपत्तीच्या विविध प्रकारांचे वर्णन करून त्यात स्वतःचा व इतरांच्या जीव कसा वाचवावा याची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांनी उपस्थित सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांची मने जिंकली व त्यांनीही या प्रात्यक्षिकांमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला. प्रात्यक्षिके सभागृहात तसेच मैदानावर दाखविण्यात आली. याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळ संचलित सर्व माध्यमांच्या माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक बघण्यासाठी उत्साहाने उपस्थिती दिली.
प्रस्तुत सत्राचे अध्यक्षपद उपप्राचार्य तथा राज्यशात्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय तुंटे यांनी भूषविले.

समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी भूषविले. तर या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून सिनेट सदस्य तथा नगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सखाराम पाटील व ग. तू. पाटील महाविद्यालय, नंदुरबार येथील संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. उपेंद्र धगधगे हे उपस्थित होते. यावेळी डॉ. धगधगे यांनी आपत्ती व्यवस्थापन व मानवी सुरक्षा या विषयावर मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.सखाराम पाटील यांनी राज्यस्तरीय कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे कौतुक केले.
दोन सत्रात संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय कार्यशाळेचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.हेमलता सूर्यवंशी यांनी केले. तर प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.जयेश साळवे व द्वितीय सत्राचे आभार प्रदर्शन संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र मराठे यांनी केले.प्रस्तुत उदघाटन समारंभास अधिसभा सदस्य प्रा.संदीप नेरकर व डॉ. सुनील राजपूत उपस्थित होते.

प्रस्तुत कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.जयेश साळवे, डॉ. रवींद्र मराठे, डॉ.माधव भुसनर, डॉ.आर सी सरवदे, ग्रंथपाल दिपक पाटील, रुसा व IQAC समन्वयक डॉ.मुकेश भोळे, प्रा.अमित शिंदे, प्रा.उषा मोरे, प्रा.विकास मोरे, प्रा.ममता पाटोळे, प्रा.प्रगती पाटील, प्रा.हर्षा पाटोळे, प्रा.हर्षाली चौधरी, प्रा.ज्योती पडूळ व प्रा.हर्षदा शिंदे, कुलसचिव राकेश निळे,भतु चौधरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी संदीप बिऱ्हाडे, रविंद्र माळी, नितीन पाटील, दिपक चौधरी व रेहान मुजावर यांनी परिश्रम घेतले. या एक दिवसीय कार्यशाळेस प्रताप महाविद्यालय तसेच बाहेरील महाविद्यालयातील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!