काही तासातच अमळनेर पोलिसांनी लावला खुनाच्या गुन्ह्याचा छडा…
प्रेम प्रसंग माहीत झाल्यामुळे नणंदने केला भावजाईचा खून
अमळनेर : शहरात आज रविवारी सकाळी शीतल जय घोगले ह्या महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती, त्या नंतर पोलिसांनी तपास लावत त्या महिलेची नणंद मंगला परशुराम घोगले व करण मोहन गटायडे अशा दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्या नंतर या दोघांनी खाकी पाहून खून आपणच केला असल्याचे मान्य केले असून त्यांनंतर त्यांना पोलीसांनी अटक केली आहे.
अमळनेर शहरातील बंगाली फाईल येथील करण मोहन गटायडे व मंगला परशुराम घोगले म्हणजे मयत महिलेची नणंद यांचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. मात्र हे सर्व शीतल जय घोगले हिला माहीत झाल्याने वरील दोघांनी तिला ठार मारले असल्याचे त्यांनी पोलिसांसमोर मान्य केलं आहे.
शौचालयास नणंद भावजाई दोघे सोबत गेले व येतांना एकटी नणंद मंगला घोगले हीच आली. येथून हा सर्व उलगडा पोलिसांनी लावत अवघ्या 7-8 तासातच गुन्ह्याचा छडा लावला आहे.