प्रकाशाकडून काही जातींना अंधाराकडे घेऊन जाणारे मुंदडा बिल्डर्स…
बौद्ध, मेहतर व मुस्लिम या जातींना घरे न देणाऱ्यांमध्ये बुंदडा बिल्डर्सही आघाडीवर
अमळनेर : सध्या बिल्डर्स लोकांकडूनच मोठ्या प्रमाणात जातीयवादी पोसला जात असल्याचे दिसते. जसे की मागील वृत्तात प्रकाशित केले होते की, 3 जातींना बिल्डर्स लोकं घरे देत नाहीत त्या म्हणजे बौद्ध, मेहतर व मुस्लिम ह्या जाती आहेत. यात अनेक बिल्डर्स लोकांची नावे आली असून दिव्य लोकतंत्रने देखील स्वतः या त्यांच्या बांधकामांवर जाऊन पुरावे गोळा केले आहेत. यात अमळनेर शहरातील प्रसिद्ध असणारे मुंदडा बिल्डर्स देखील आघाडीवर आहे असे दिसून आले.
मुंदडा बिल्डर्सने त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या काळात बौद्ध, मेहतर व मुस्लिम या लोकांना घरेच दिली नाहीत. पण यांचे सर्व बांधकाम मुस्लिम लोक करतात तर काही ठिकाणी सफाई मेहतर लोकं करीत असतात, तर कधी तरी काही कामांवर बौद्ध समाजाच्या लोकांची देखील गरज त्यांना भासत असते. मात्र जेव्हा त्या लोकांना घरे देण्याची वेळ येते तेव्हा ही लोकं त्यांची जात बघतात.
दिव्य लोकतंत्रने अनेक बिल्डर्स लोकांच्या बांधकामावर जाऊन या बाबत माहिती घेत पुरावे जमा केली आहेत. यात किती घरे विकली गेली, किती शिल्लक आहेत व कोणकोणत्या जातींना घरे दिली जातात – सध्या कोणत्या जाती वास्तव्य करतात यांसह अनेक प्रकारची माहिती घेतली आहे. व त्याची सर्व ऑडिओ रेकॉर्डिंग व व्हीडिओ दिव्य लोकतंत्रकडे आहेत.
मुंदडा बिल्डर्सच्या कोणत्याही प्रकल्पावर घरे पाहण्यासाठी लोकं जातात तेव्हा त्यांना आधी नावाच्या आड मध्ये त्यांची जात विचारली जात, फक्त नाव सांगून चालत नाही तर आडनाव देखील सांगावे लागते, त्या नंतर जर समजा आडनाव वरून त्यांना माहिती पडले की, तुम्ही बौद्ध, मेहतर किंवा मुस्लिम असाल तर तुम्हाला शिल्लक घरे दाखवली जाणार नाहीत, व सरळ सांगितले जाते की घरे शिल्लक नाहीत. आणि मात्र समजा तुम्ही जर वरील 3 जाती सोडून इतर कुठल्याही जातीचे असाल तर तुम्हाला मात्र इज्जतीने सगळी घरे दाखवली जातात.
मुंदडा बिल्डर्सचे सर्वेसर्वा ओमप्रकाश मुंदडा यांचे तालुक्यात चांगले नाव आहे. एक उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणून ते तालुक्यात परिचित आहेत. मात्र अशा प्रकारची वागणूक जर एका आदर्श व्यक्तीमहत्वाकडून दिली जात असेल तर इतर लोकांनी काय करावे ?