संशोधनात लिखानाचे शास्त्र महत्वाचे… अधिष्टाता सुनिल गोयल यांचे प्रतिपादन
अमळनेर : येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अंतर्गत राज्यशास्त्र संशोधन केंद्र व राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा ही संशोधन तंत्रे यावर नुकतीच संपन्न झाली.
प्रस्तुत राष्ट्रीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी मंचावर उदघाटक योगेश मुंदडे यांच्यासह संचालक प्रदिप अग्रवाल, प्राचार्य डॉ. अरुण जैन, सह सचिव डॉ. धिरज वैष्णव, प्रमुख बीजभाषक प्रोफेसर सुनिल गोयल (अधिष्टाता, सामाजिक शास्त्रे प्र शाळा, डॉ.आंबेडकर विद्यापीठ, महू,मध्यप्रदेश),डॉ. अरुणकुमार साहू (महू,मध्यप्रदेश), संसाधन व्यक्ति डॉ.संतोष खत्री (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे), डॉ.उमेश गोगडीया (कबचौ उमवि,जळगाव), डॉ.अरुण पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला, प्राचार्य डॉ. दिलीप भावसार आदी उपस्थित होते.
प्रारंभी सरस्वती, पूज्य साने गुरुजी, दानशूर प्रताप शेठजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण उदघाटक योगेश मुंदडे व प्रदिप अग्रवाल, प्रोफेसर सुनिल गोयल, डॉ.अरुणकुमार साहू, प्राचार्य डॉ.अरुण जैन यांच्या हस्ते झाले.
या वेळी म्युझिकल स्वागत गीत डॉ.हर्ष नेतकर यांच्यासमवेत सृजन संदानशिव,रोषणी अहिरे,दिपाली बिऱ्हाडे,ललिता धनगर आदींनी म्हटले.
प्रस्तुत कार्यशाळेचे प्रयोजन अथवा प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विजय तुंटे यांनी केले.
सदर कार्यशाळेचे उदघाटक योगेश मुंदडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, संशोधन क्षेत्र अलीकडे विकसीत होत आहे, जागतिक स्तरावर पेटंट घेणारे बहुतांशी युवक भारतीय आहेत, स्वास्थ व शैक्षणिक क्षेत्रात संशोधनासाठी मोठया प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावे, असे आवाहन या वेळी केले.
या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी सांगितले की, प्रताप कॉलेज हे सातत्याने गुणवत्तापूर्ण कार्यात अग्रेसर असते, रुसा अंतर्गत १० पेक्षा जास्त प्राध्यापकांचे संशोधन प्रकल्पावर कार्य सुरू आहे,अशा स्वरूपाची माहिती दिली.उदघाटन सत्राचे सूत्र संचालन डॉ.संदीप नेरकर यांनी केले तर आभाराचे काम कार्यशाळेचे संयोजक डॉ.सुनिल राजपूत यांनी केले.
पहिल्या सत्रात बीजभाषक प्रोफेसर सुनिल गोयल यांनी विद्यार्थी,संशोधक,गाईड,फेकल्टी मेंबर या सर्वांना संशोधन तंत्रे,संशोधन पेपर कसे लिहावे,काय निकष लक्षात घ्यावे,कोणतेही कार्य हे मनापासून करावे,आपण कार्याप्रती योगदान देणे हे एक नैतिक दायित्व असते,उद्दिष्ट लक्षात घेऊन लेखन असावे या संबंधी मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.प्रस्तुत समारंभाचे सत्राध्यक्ष डॉ.उमेश गोगडीया यांनी बीजभाषकांच्या मनोगतातील सार सांगितले.
दुस-या सत्रात प्रोफेसर सुनिल गोयल यांनी संशोधकांनी आपले प्रबंध कसे तयार करावे या संबंधी पीपीटी द्वारे सूक्ष्म माहिती दिली.तिस-या सत्रात डॉ.संतोष खत्री(धुळे) यांनी संशोधन करताना शासकीय अनुदान संस्थेची अधिकृत माहितीचे सादरीकरण केले,अशा संस्थाकडे प्रस्ताव कसे व केव्हा पाठवावे या संबंधीची विस्तृत माहिती दिली.या सत्राचे अध्यक्ष डॉ.अरुण कुमार साहू यांनी अगदी सुरुवाती पासून ते शेवटच्या बीजभाषकांच्या मनोगताचे निष्कर्ष विषद केले.या सत्राचे आभार डॉ.सुनिल राजपूत यांनी मानले.
समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे,डॉ.सुनिल गोयल,डॉ.अरुण कुमार साहू,डॉ.उमेश गोगडीया,डॉ.संतोष खत्री, डॉ.धिरज वैष्णव,रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे हे उपस्थित होते.या वेळी डॉ.अनिल शिंदे यांनी भारतात संशोधनाची स्थिती व महत्व या बद्दल माहिती दिले.आपल्या समारोपीय अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी उपस्थित सर्व सहभागीना संशोधन करण्यामागची भूमिका विषद केली आणि सर्वाना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिले.
प्रस्तुत समारोप प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात आफ्रिन खान,साक्षी पाटील,निकिता पाटील,तृप्ती सोनवणे,रोशनी अहिरे,शुद्धोधन बागूल,मयुरी जैन,डॉ.उमेश गोगडीया, डॉ.संतोष खत्री, डॉ.विरेंद्र घरडे,डॉ.माधव वाघमारे,प्रा.यादव बोयेवार,डॉ.रविंद्र माळी, प्रा.नितीन ननवरे आदींना प्रमुख अतिथी द्वारे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
या प्रसंगी कार्यशाळे संबंधी डॉ.मिना काळे(एरंडोल),डॉ.माधव वाघमारे(नंदुरबार),प्रशांत नेरकर(धुळे),अविनाश मराठे(धुळे) आदींनी आपले अभिप्राय दिले.समारोप समारंभाचे सूत्र संचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी केले तर आभार डॉ.सुनिल राजपूत यांनी मानले.
प्रस्तुत कार्यशाळेसाठी ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.हर्षवर्धन जाधव, प्रा.धनंजय चौधरी,डॉ.कैलास निळे,डॉ.माधव भुसनर,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.आर सी सरवदे,डॉ.रवी बाळसकर,डॉ.विवेक बडगुजर, डॉ.किरण गावित,प्रा.विजय साळुंखे,प्रा.एस ए जोशी,डॉ.योगेश तोरवणे,डॉ.बालाजी कांबळे,डॉ.अनिल झळके आदी उपस्थित होते.
प्रस्तुत समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.अरुण जैन, डॉ.धिरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,प्रा.विजय तुंटे,डॉ.मुकेश भोळे, प्रा.संदीप नेरकर,डॉ.सुनिल राजपूत,डॉ.राखी घरटे,डॉ.प्रदिप पवार,प्रा.दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर यांच्यासह सीसीएमसी विभागातील दिलीप दादा शिरसाठ,पराग पाटील,अमोल अहिरे,अतुल धनगर,विशाल अहिरे आणि राज्यशास्त्र विभागातील तुप्ती सोनवणे,गायत्री गिरासे,काजल पाटील,अश्विनी बिऱ्हाडे,पायल जाधव,पल्लवी पाटील,वैष्णवी भंडारी,मयुरी जैन,दिपाली बिऱ्हाडे,लक्ष्मी पाटील,साक्षी पाटील,ज्योती पाटील,आफ्रिन खान,निकिता पाटील यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.