मन स्वच्छ करा, माणुसकी जपा व नारीशक्तीला वंदन करा… ऍड. ललिता पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय अंतर्गत अँटी रॅगिंग समिती व फिनिक्स ग्रुपच्या विद्यमाने आयोजित मुलांचे समुपदेशन यावर व्याख्यानाचे आयोजन पूज्य साने गुरुजी सभागृहात २०.०९.२०२४ रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान करण्यात आले. प्रस्तुत समुपदेशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव हे होते.
या प्रसंगी व्यासपीठावर वसुंधरा लांगडे, डॉ.प्रतिभा पाटील, लता पाटील, डॉ.कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे उपस्थित होते.
प्रारंभी समारंभाचे प्रास्ताविक खानदेश शिक्षण मंडळाचे विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत म्हटले की, आज महिलांनी जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण होतो ? म्हणून महिलांवर अत्याचार होऊ नये म्हणून मुलांचे योग्य समुपदेशन होणे आवश्यक आहे,मुलींनी स्वतः वाचविणे महत्वाचे आहे त्यासाठी ज्यूदो शिकणे व आत्म संरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचे अधिकार मिळणे आवश्यक आहे. सुनो द्रौपदी शास्त्र उठावो अशा पंक्तीतून आपल्या भावना व्यक्त केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ऍड. ललिता पाटील यांनी विस्तृत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, आज मुलींनी प्रेमाच्या मागची भावना समजून घेतले पाहिजे, मुलींना तलवारी चालविता येणे गरजेचे आहे.मुलांची प्रतिष्ठा, मान-सन्मान जपणे आज फार गरजेचे आहे, नारी शक्तीला वंदन करा व भय मुक्त जगा,विचार हाच दागिना आहे म्हणून चांगले विचार आचरणात आणणे आजच्या परिप्रेक्ष्यात महत्वाचे आहे, असे परखड मत यावेळी व्यक्त करताना त्या भावनाशील झाले.
मुलींनो जीवनात मोकळ्यामनाने जगा,बोलायला व संवाद साधायला शिका,योग्य मार्गावर चालताना खरे बोलायला शिका, देशासाठी काही तरी द्यायला शिका असे स्पष्ट मत यावेळी विषद केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. धिरज वैष्णव म्हणाले की, मुलीचा जन्म हा घरातील आनंद व उत्सव असतो. मुलीवर अत्याचार होऊ नये यासाठी प्रबोधनाची गरज आहे,मुलींचे-आईचा सल्ला घेत जगणे हे आज वेळेची गरज आहे.म्हणून नारी वंदन करताना मूल्य व अध्यात्म उपयुक्त ठरू शकते अशी भूमिका विषद केले.
या प्रसंगी सभागृहात डॉ. नलिनी पाटील, प्रा.पुष्पा पाटील, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. वैशाली राठोड, प्रा. वृषाली वाकडे, डॉ.अशोक पाटील, डॉ.महेंद्र महाजन, डॉ.आर सी सरवदे, डॉ. माधव भुसनर, डॉ.कैलास निळे, डॉ.रमेश माने, डॉ.तुषार रजाळे, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.विवेक बडगुजर, डॉ.किरण गावित, प्रा.संतोष दिपके, प्रा. रामदास सुरळकर, डॉ.प्रमोद चौधरी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्तुत समारंभाचे आभार डॉ. नलिनी पाटील यांनी मानले.