धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सात जणांवर गुन्हे दाखल

0

ईदच्या उरूसमध्ये गावठी कट्ट्याने फायर झाल्याचा तक्रारदारचा आरोप

 

अमळनेर : शहरात गुरुवारी शहराच्या विविध भागातुन मुस्लिम धर्मीयांकडून ईद ए मिलाद निमित्त जुलुस काढण्यात आले असता त्यामध्ये धार्मिक भावना दुखावतील अश्या घोषणा देऊन हिरवा झेंडा फडविणे व गावठी पिस्तुलने गोड्या झाडण्याप्रकरणी अमळनेर पोलिसात तक्रारदारने दिलेल्या तक्रारीवरून सुमारे सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दि १९ रोजी अमळनेर शहराच्या विविध भागातून मुस्लीम समाजाने जुलूस काढले होते. यात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज सहभागी झाले होते. दरम्यान शाहआलम नगर कडील जुलुस हा आखाडा मैदानाकड़े जात असतांना झामी चौक जवळ आला असता त्यावेळी मिरवणुकी्तील काही मुस्लिम तरुणांनी हिदु धर्माच्या लोकांच्या घरासमोर धर्मिक तेढ निर्माण होइल अशा स्वरूपाची गाणी वाजवून प्रक्षोभक स्वरूपाच्या घोषणा देवुन शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला व एका अनोळखी तरुणाने गावठी पिस्तूल द्वारे दोन वेळा फायर केला व एका अज्ञात इसम याने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या यामुळे देशाच्या एकात्माता आणि अखंडता धोक्यात आणण्याचे उद्देशाने चिथावणीखोर घोषणा देत शहरातील दगडी दरवाज्यावर हिरवा झेंडा फडकविला असल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या बाबत सुमारे सहा लोकांवर अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 189 (1), 189 (2), 191(2), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1), 37(3), 135, शास्त्र अधिनियम 3, 25, 7, 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!