राहुल गांधी यांच्या बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करून अटक करा व खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…
काँग्रेसचे अमळनेर पोलीस निरीक्षकांना निवेदन
अमळनेर : तालुका व शहर काँग्रेस कमिटी कडून विनंती शुक्रवारी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात “राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाखाचे बक्षीस देईन” असे बेताल वक्तव्य केले होते, त्याबद्दल संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच कर्नाटकात झालेल्या घटनेची वस्तुस्थिती लपवून फेक वृत्तास, व्हाट्सअप व इलेक्ट्रॉनिक मीडिया कडून प्रसिद्धी देऊन, जनतेची दिशाभूल करून, जाती जातीत तेढ निर्माण केला जात आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. व सोशल मीडियावरील वरील घटनेची लिंक व खोटी माहिती त्वरित काढण्यात यावी. तर पुढील प्रसारण बंद करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. निवेदन देते वेळी अमळनेर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.