मशिदीवर गुलाल फेकल्याच्या कारणाने अमळनेर येथील एका मंडळावर गुन्हा…
गणपती विसर्जनाच्या दिवशी फेकला होता गुलाल
अमळनेर : शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी कसाली मोहल्ला परिसरातील जामा मशीदीवर गुलाल फेकल्याने गणेश मंडळाच्या अध्यक्षासह पदाधिकारी व सभासद यांच्यावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत फिर्यादीत दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरात दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री गणपती विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. त्यातच शहरातील माळी वाडा येथील त्रिमुती गणेश मित्र मंडळाने श्री. गणेशाची मुर्ती ट्रॅक्टरवर ठेवुन चामुंडा डि.जे. अमळनेर हे वाद्य वाजवित परिसरातील लोकासह नांचत – गुलाल उधळत माळी वाडा- भोई वाडा – कसाली मोहल्ला मार्गे जामा मस्जिद जवळ आले, यावेळी ते हातातील गुलाल मशिदीकडे उधळत होते ही बाब मशिदी जवळ उभे असलेल्या सलीमोद्दीन कमरोद्दिन व मशिद पंचानी सदरच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष यांना सांगून देखील मशिदीवर गुलाल उधळल्याचे सलीमोद्दीन कमरोदोन यांनी इकबाल खान पठाण यांना याबाबत माहिती दिली. तेव्हा तेथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता मशिदीवर गुलाल उधळल्याचे आढळून आले. मशिदीवर गुलाल फेकल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे मुस्लीम समाजाचे पंच मंडळ व मशिदीचे ट्रस्टी तसेच सलीमउद्दीन कम्रोउद्दीन यांचेसह अमळनेर पोलीस ठाण्यात इकबाल खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्रिमुती गणेश मित्र मंडळाचा अध्यक्ष रोहित हेमराज महाजन, इतर पदाधिकारी व सर्व सदस्यांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९८, ३ (५), म. पो. अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) ,३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाबत पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.