चिमणपुरी पिंपळे येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून घडवले भारतीय संस्कृतीचे दर्शन
ग्रुप ग्रामपंचायत व ओम साई क्लासेसचा सांस्कृतिक उपक्रम
अमळनेर : सगळीकडेच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असताना यामाध्यमातून एक चांगला संदेश समाजासमोर मांडण्याचा आणि गावातील मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चिमणपुरी पिंपळे खुर्द
ग्रुप ग्रामपंचायत व ओम साई क्लासेस आणि गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झाला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत तसेच प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार किरण पाटील , संजय पाटील, जितेंद्र ठाकूर, उमेश काटे, विजय पाटील, डी. ए.धनगर, जे. एस. पाटील, डी. बी. पाटील, योगेश पाटील, डाॅ. योगेश पाटील, अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील , शिवदास पाटील,संजय चौधरी, गोविंद अग्रवाल,पर्यांक पटेल,जयदीप राजपुत उपस्थित होते.सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा गावाचे रहिवाशी अविनाश पाटील यांचा सर्व ग्रामस्थांकडून भव्य सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय मनोगतात चेतन राजपूत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गावातील उपक्रमशील शिक्षक डी. बी. पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये गीत, नृत्य, नाटिका, भारूड, भाषणं सादर केली हल्लीच्या घडामोडी वरती महिलांवर ती अत्याचार नाटिका सादर करण्यात आली ग्रामस्थां समोर तसेच डी आर पाटील व लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसं देण्यात आले.अविनाश पाटील यांनी गावातील स्काॅलरशीप परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोमेन्टो देऊन त्यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन ओम साई क्लासचे संचालक ज्ञानेश्वर पाटील यांनी केले ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व माता भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.