आधार तर्फे पोषण आहार सप्ताह साजरा

अमळनेर : आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्यामार्फत रूपजी नगर अमळनेर येथे अंगणवाडी सोबत पोषण आहार सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मुलांना सकस पोषण आहार संतुलित समृद्ध कडधान्य , पालेभाज्या , फळांचे महत्व ,व आहारातील विविध जीवनसत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका कल्पना रामदास सपकाळे आधार संस्थेच्या आधार आरोग्य प्रोजेक्ट मॅनेजर दिप्ती गायकवाड व आरोग्य मित्र हर्षाली पवार आणि पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथील द्वितीय वर्ष विद्यार्थिनी मोहिनी धनगर, बालगोपाल मंडळी आदी उपस्थित होते, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला.
