गांधलीपुऱ्यात सामाजिक एकोप्याचे दर्शन

0

गांधलीपुरा भागात मुस्लिम समाजाकडून गणपती विसर्जन मिरवणुकीचे स्वागत

अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात सामाजिक एकोप्याचे दर्शन झाले असून मुस्लिम समाजाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. काही दिवसांपूर्वी ह्याच भागात गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची अफवा पसवण्यात आली होती, मात्र मुस्लिम समाजाकडून या मिरवणुकीचे स्वागत झाल्याने मागील घटना खरच अफवाच असल्याचे समजते.

 

सविस्तर वृत्त असे की, काही दिवसापूर्वी दोन समाजात गैरसमजातून वाद निर्माण झाला होता. मात्र वेळीच पोलीसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली व वातावरण निवळले.

मंगळवारी झालेल्या लाडक्या गणेश विसर्जनाला मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा निर्माण व्हावा म्हणून गणेश मंडळांचे पुष्पहार देऊन स्वागत करून एक पाऊल पुढे टाकल्याने परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले होते.गांधलिपुरा भागातील मेहतर समाज गणेश मित्र मंडळाचा विसर्जनला गांधलीपुरा भागातील गरीब नवाज चौकात मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.अस्ता अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरी चे अध्यक्ष रियाज़ भाई मौलाना व सहकारी मुस्लिम बांधवांनी मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.

या गोष्टीला प्रतिसाद देत वाल्मीकि महेतर समाज मित्र मंडळांने पण मुस्लिम बांधवांनवर गुलाल न टाकता फुलांची पाकळे उधळून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी हिन्दू-मुस्लिम एकोपाच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.अनेकांनी या गोष्टींचे स्वागत करून कौतुक केले.

या प्रसंगी अर्जुन कलोसे, रितिक हटवल, आदर्श दोहरे, रोहित कलोसे, दर्शन तेजी, यशवंत पवार, यश पवार, दिपक पवार, नुकुल गुसर, रौशन चंडाले, रिषि कलोसे, अक्षय कलोसे,नितिश लोहरे, पप्पू कलोसे, विक्की घोघले, ठकराल कलोसे, रमेश भाऊ परधी,भुरा भाऊ पारधी,रागव पारधी, गणेश पारधी, संतोष पारधी, गोलू लोहरे, जहूर मुतवल्ली, सलीम टोपी,अ. गफ्फार खाटीक, अ.खालीक रसना, अ.रज्जाक शेख, मुजफ्फर सेठ, कालू सर ,बशीर हाजी,इकबाल पटले, आकीब अली, राजु शेख, लियाकत सैय्यद, हसन सेठ, अयाज अली, फारूख शेख, मुजाहिद सैय्यद, शाहरुख खाटीक, हैदर मिस्त्री, सिकंदर शेख, हाजी के बी शेख, आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!