पुरोगामी मुखवट्याआड जातीयवादाची कीड…
घरे न देणाऱ्या बिल्डर्समध्ये पुरोगामी व विधानसभा इच्छुक उमेदवारांचीही नावे

अमळनेर : जनतेत पुरोगामी मुखवटा घेऊन फिरणाऱ्या व सध्या विधानसभेची तयारी करणाऱ्या सुमारे दोन बिल्डर्सची नावे समोर आली आहेत. पुरोगामी चेहरा दाखवणाऱ्या या दोघांना देखील जातीयतेची कीड लागली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व आपल्या डोक्यात जातीय वादाचे विष असल्याने आधी जाती बघून घरे दिली नाहीत तर आता त्याच लोकांकडे मते मागायला जातांना यांना लाजा वाटत नाहीत.
ही दोन्हीही लोकं आधी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व बामसेफ सारख्या संघटनांमध्ये कामं करीत होती व यातून आम्ही पुरोगामी असल्याचे जनतेला भासवत होती. मात्र काही बिल्डर्स लोकांचं ठरल्या प्रमाणे जेव्हा यांच्याकडे विशिष्ट जातीची लोकं घरे घ्यायला जायची तेव्हा मात्र यांचा पुरोगामी चेहरा कुठं जायचा हा प्रश्न निर्माण होतो.
गेल्या दोन दिवसांपूर्वी “अमळनेरला जातीयतेचा मळ; विशिष्ट जातींना घरे देण्यास काही जातीयवादी बिल्डर्सचा नकार” अशी बातमी दिव्य लोकतंत्रने प्रकाशित केली होती, त्यानुसार अमळनेर शहरातील ९५% बिल्डर्सचा नलायकपणा आमच्या वाचकांनी आमच्या समोर मांडला. त्यात वरील दोन्ही पैकी एका बिल्डर कडे लोकं पैसे घेऊन फिरायचे मात्र तरीही त्याने घरे देण्यास तयारी दर्शविली नाही, म्हणून आता मतदार संघात ह्या विशिष्ट जातींची हजारो मतदार आहेत. तेव्हा हे मतदार यांना मते देण्यासाठी कसे तयार होतील हाच प्रश्न त्या दोघांसाठी आहे. यातील एक या विषयात 75 टक्के आहेत तर एक 25 टक्के आहे, मात्र ही कीड या दोघांच्या मनात आहेच !
ही दोन्ही लोकं सध्या महाविकास आघाडीच्या एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत.
इतर बिल्डर्सची देखील नावे आमच्या जवळ पुराव्यानिशी आहेत त्यांना देखील या मालिकेच्या माध्यमातून उघड केले जाणार आहे…
