सामाजिक न्यायासाठी सजग नागरिकांची देशाला गरज असलम बागवान
अमळनेर : देशातील प्रत्येक घरात, समाजात सामाजिक न्यायाचा अभाव जाणवतो. लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायालय व न्यायाधीश नसल्याने न्याय मिळायला दीर्घकाळ लागतो. न्याय विलंबाने मिळणे म्हणजे न्याय नाकारण्या सारखे असते. मूलभूत हक्कावर गदा येत असेल तर ज्या ठिकाणी मूलभूत हक्क नाकारला जातो, त्याच ठिकाणी न्यायदानाची व्यवस्था झाली पाहिजे. सामाजिक न्यायासाठी सजग नागरिकांची भारताला गरज आहे असे प्रतिपादन पुणे- दिल्ली सामाजिक न्याय पदयात्रेचे नेते असलम बागवान यांनी केले ते अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संवाद साधताना केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अशोक पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सोनवणे सरांनी केले .सागर कोळी व अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रश्नही विचारले याप्रसंगी रियाज भाई मौलाना, संदीप घोरपडे , ऍड .रज्जाक शेख ,ताहेर भाई ,युसुफ पेंटर, सईद भाई ,साहिल अख्तर आदी मान्यवर उपस्थित होते.