अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील

0

शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अमळनेर : आपलं शहर तथा आपलं गाव समृद्ध करायचं असेल तर आपल्या सर्वाना एक व्हावंच लागेल,जनतेचा आशीर्वाद राहिला तर आपल्या गावाचा व मतदारसंघाचा सुरू असलेला प्रगतीचा आलेख कुणीच थांबवू शकणार नाही,आणि कोणत्याही शासकीय योजनेपासूनही आपण वंचित राहणार नाही असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
युवा राजे शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यान्नी अभिनव ऊपक्रम राबवून शिवाजी नगर परिसरातील जेष्ठ नागरिकांचे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज भरून लाभार्थी महिला व पुरुषांना वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार असून जळगाव जिल्हयासाठी 1000 व्यक्तींना याचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणाहून भरून घेतले जात आहेत.शिवाजी नगर परिसरात सदर योजनेसाठी मोठा प्रतिसाद लाभून 55 जणांचे अर्ज भरून घेण्यात आले.
अर्ज वितरण प्रसंगी नगरपरिषदेच्या वतीने सोमचंद संदानशिव यांनी प्रास्तविक करत योजनेची सविस्तर माहिती दिली.तर मंत्री अनिल पाटील यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले,शहर व मतदारसंघात मंजूर व सुरू असलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी दिली.नवीन 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी मंत्री श्री पाटील यांचे कौतुक केले.सदर योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या श्रीमती विमलताई ईच्छाराम पाटील यांचा सत्कार मंत्री पाटील यांनी केला.
यावेळी माजी नगरसेवक प्रताप शिंपी, शरद पाटील विनोद कदम, सोमचंद संदानशीव उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अरुण पाटील यांनी मानले.
दरम्यान सदर योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत दिनांक 18 सप्टेंबर, 2024 पर्यत वाढविण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमोद वाघ ईशान बडगुजर, निलेश सोनार , गोलू कासार, मनोज मराठे, राहुल मराठे, गणेश कासार, शुभम वाघ ,ललित पाटील, कार्तिक पाटील, हर्षल मराठे व युवा राजे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!