तपासणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलींची छेडछाड
अमळनेर तालुक्यातील एका डॉक्टरचा नालायकपणा
डॉक्टरला चोप मात्र इज्जतीचा आव आणत गुन्हा दाखल करणे टाळले
अमळनेर : तालुक्यातील एका दवाखान्यात तपासणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलींची डॉक्टराने छेडछाड केल्याच्या चर्चांना तालुक्यात उधाण आले आहे. रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनेच असे नालायक कृत्य केल्याने सर्वत्र संतापाच्या भावना व्यक्त होत आहेत. या नालायक डॉक्टरला मुलींच्या नातलगांनी दवाखान्यात जाऊन त्याच दिवशी चोप दिला मात्र मुलींची इज्जत जाईल याचा गावातील काही लोकांकडून आव आणला गेला व हा गुन्हा दाखल होणे टळले आहे. हा डॉक्टर त्याच गावाचा व सुशिक्षित परिवाराचा असल्याने गावातील अनेक लोकांनी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या बाबत दिव्य लोकतंत्र महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार करून महिला व बाल विकास विभाग याकडे लक्ष येईल हे निश्चित.
दिव्य लोकतंत्रकडे या बाबत संपूर्ण माहिती उपलब्ध असून या बाबत सविस्तर बातमी प्रकाशित करण्यात येईल….