महेंद्र बोरसे व सात्रीचा पोलीस पाटील विनोद बोरसे फरार
महेंद्र बोरसे व विनोद बोरसे यांनीच गोपालवर हल्ला करण्यास सांगितले… आरोपींची पोलिसात कबुली
अमळनेर : येथील रेशन माफिया व सात्री गावाचा माजी सरपंच महेंद्र बोरसे यावर गेल्या काही दिवसांपूर्वी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश पाटील यांचा मुलगा गोपाल पाटील यावर चाकू हल्ल्याबाबत हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत होती. यातील 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली, अटक केल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींनी कबूल केले की, महेंद्र बोरसे व त्याचा भाऊ विनोद बोरसे या दोघांनी आम्हाला गोपाल पाटील यास मारण्यासाठी सांगितले होते. अटक आरोपींनी दिलेल्या कबुली जबाब नुसार सात्रीचा पोलीस पाटील विनोद बोरसे याचे देखील नाव वाढविण्यात आले आहे. आम्हाला आमच्या रेशन दुकान कामात अडथळा आणतो म्हणून त्याला संपवायचे आहे असे या आरोपींना या दोघांनी सांगितले होते.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून महेंद्र बोरसे व त्याच्या भावाच वाढीव नाव गुन्ह्यात आल्यापासून विनोद बोरसे देखील फरार झाला आहे.
तर रेशनच्या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्याला जीवे मारण्यासाठी सुपारी देणाऱ्या महेंद्र बोरसे याच्याकडे जेवढी दुकाने आहेत ती सगळी दुकाने तहसीलदार अमळनेर यांनी काढून घ्यावीत अशी मागणी होत आहे.
सर्रास गुन्हेगार शोधायला पोलिसांना काही वेळ लागत नाही तर ह्या दोघांना शोधायला एवढा वेळ कसा असा प्रश्न निर्माण होत आहे, की यावर कोणी अदृश्य शक्तीचा हात असावा असाही प्रश्न निर्माण होतो. कारण जिकडे सत्ता तिकडे महेंद्र बोरसे फिरत असतो त्यामुळे त्याचे अनेक ठिकाणी पाठीराखे आहेत.