अमळनेरला जातीयतेचा मळ…
विशिष्ट जातींना घरे देण्यास काही जातीयवादी बिल्डर्सचा नकार

अमळनेर : आधीही एका वृत्तात दिव्य लोकतंत्रने अमळनेरचा अर्थ स्पष्ट केला होता, अमळनेर म्हणजे कुठल्याही प्रकारचा मळ नसलेले शहर… असा त्याचा अर्थ होय. मात्र याच अमळनेर शहरात सध्या जातीयतेचा मळ लागलेला दिसून येत आहे. शहरात विशिष्ट तीन जातींना घरे देण्यास काही बिलर्स नकार देत असल्याचे पुरावे दिव्य लोकतंत्रकडे प्राप्त झाले आहेत. अमळनेर शहरात विशिष्ट 3 जाती सोडून इतर कुठल्याही जातींना घरे विनाअट मिळत असतात. मग या तीनच जातींना का नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
धंदा करायचा असेल तर अशा पद्धतीने जातीयवादी मानसिकतेतून काही जातींना घरे देतांना टाळणे हे अत्यंत चुकीचे असून बेकायदेशीर देखील आहे.
