जळगाव रेल्वे स्थानकावर नागरिकांच्या प्रश्नावर वाघांची डरकाळी

0

डीआएमला आदेश देताच साकेत एक्सप्रेस थांबली जिल्ह्यातील तीन न थांबणाऱ्या स्थानकांवर

 

अमळनेर : आज शुक्रवारी मुंबईहून जळगांव कडे येत असताना खासदार स्मिता वाघ व आ राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगांव रेल्वे स्थानकावर उतरले. त्यावेळी रेल्वे स्थानकावर रोज ये-जा करणारे नोकरदार वर्ग तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्यानी खासदार स्मिता वाघ व आ राजुमामा भोळे यांना माहिती दिली की, आज भुसावळ-इगतपुरी ७:१५ वाजताची मेमो अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केली. आम्ही सर्व १५०/२०० प्रवाशांना आता पाचोरा – चाळीसगाव जाण्यासाठी एकही गाडी नाही, तेव्हा तात्काळ खासदार स्मिता वाघ यांनी डीआरएम भुसावळ यांच्या सोबत बोलण करून गाडी नंबर २२१८४ साकेत सुपर फास्ट एक्सप्रेस जळगांव स्थानकावर २ मिनिटाचा थांबा देऊन पुढील पाचोरा, चाळीसगाव स्टेशनला सुद्धा थांबा देण्याचे आदेश दिले. त्यावेळी सर्व विद्यार्थी व प्रवाश्यानी खासदार स्मिता वाघ व आ. राजुमामा भोळे यांचे आभार मानले.

साकेत एक्सप्रेस जळगाव, पाचोरा व चाळीसगाव या स्थानकांवर थांबत नाही, मात्र खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थी व प्रवाश्यांची अडचण पाहून तात्काळ प्रशासनाला ही एक्सप्रेस जळगाव, पाचोरा व चाळीसगाव या स्थानकांवर थांबवण्याचे आदेश देत प्रवाशांसाठी प्रशासनावर स्मिता  वाघांनी चांगलीच वाघासारखी डरकाळी फोडल्याने न थांबणाऱ्या स्थानकांवर देखील एक्सप्रेस थांबली यामुळे विद्यार्थी व इतर प्रवाश्यांमध्ये देखील स्मिता वाघांबाबत अपेक्षा पूर्ण झाल्याचे समाधान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!