काँग्रेसकडून के.डी पाटील इच्छुक उमेदवार
भेटी गाठी सुरू; जनतेने व पक्षाने संधी देण्याची पाटील यांची अपेक्षा
अमळनेर : शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेले नाव म्हणजे के.डी. पाटील…. धनदाई महाविद्यालयात / संस्थेत ते पदाधिकारी आहेत. के.डी. पाटील यांनीही विधानसभा निवडणुक लढण्याची तयारी दर्शविली असून त्यांच्या मतदार संघात भेटी-गाठी सुद्धा सुरू झाल्या आहेत. तर मी स्वच्छ व अनुभवी चेहरा असून मला पक्षाने व जनतेने संधी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. के.डी. पाटील हे धुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या विविध पदांवर कार्यरत होते तर जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेले आहेत. सध्या ते काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. तर त्यासोबतच त्यांचा अमळनेर मतदार संघात सुद्धा दांडगा जनसंपर्क आहे.
मतदार संघासाठी के.डी. पाटील यांचे अनेक ध्येय असून त्यानुसार मी पहिल्या दिवसापासून चालेल, मतदार संघातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची गरज राहणार नाही, शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आणण्याचा प्रयत्न करेल, यांसह अनेक लोककल्याणकारी कामांवर माझा भर असेल त्यांचे म्हणणे आहे.
मी सामान्य परिवरातून मोठा झालो, अनेक कष्टातून उच्च शिक्षण घेतले, मी माझ्या जीवनात काम करत असताना अनेक कल्पना माझ्या मनात आहेत. त्यांचा मी माझ्या मतदार संघाच्या कल्याणासाठी वापर करेल. माझ्या शाळेत मी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतो, याआधी मी अनेक वेळेस जनतेच्या सेवेत उभा राहिलो आहे. यामुळे माझा दांडगा जनसंपर्क मतदार संघात आहे. म्हणून मी यावर्षी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. माझा पक्ष व मायबाप जनतेने आतापर्यंत साथ दिलीच आहे, तर यापुढे देखील साथ देतील हीच अपेक्षा !
के.डी पाटील
इच्छुक उमेदवार – काँग्रेस