धार तालावात घरातील एकुलत्या एक मुलाचा बुडून मृत्यू
अमळनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना
अमळनेर : तालुक्यातील कंडारी येथील जयेश देसले नामक विद्यार्थी अमळनेर येथे शिकायला आला होता. प्रताप पॅटर्नच्या JEE व NEET परीक्षांची तयारी हा विद्यार्थी करित होता. अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात तो मित्रांसोबत राहत असे, काल मित्रांसोबतच तो धार तलावात पोहायला गेला. मित्रांसोबत पोहत असतांना तो खोल पाण्यात गेला व तेथेच त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याआधी त्याच्या मित्रांना खोल पाण्याचा अंदाज आल्याने ते बाहेर आले होते, मात्र जयेश तेथेच होता. शेवटी जयेशचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती सर्वत्र पोहचली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील कंडारी येथील जयेश भरत देसले हा विद्यार्थी मारवड येथे ज्युनिअर कॉलेजला शिक्षण घेत होता. यावर्षी तो 12 वर्गात प्रवेशित असून प्रताप महाविद्यालयात प्रताप पॅटर्नला देखील JEE व NEET या परीक्षांची देखील तयारी करीत होता. शुक्रवारी दुपारी तो अमळनेर तालुक्यातील धार येथील तलावात मित्रांसोबत पोहायला गेला होता…. मित्र पाण्याचा अंदाज घेऊन बाहेर निघाले व थोडक्यात बचावले. मात्र जयेश जास्त पाणी असल्याने तेथेच बुडाला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मारवड पोलीस व स्थानिक नागरिकांच्या अनेक मेहनतीने शेवटी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यास मारवड पोलीस व स्थानिकांना यश आले.
जयेश हा घरातील एकटा मुलगा होता, पुढे चालून तो आपल्या आई वडिलांची म्हातारपणाची काठी होणार होता. आई वडिलांनी त्याला मोठे स्वप्न पाहत, JEE व NEET सारख्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी प्रताप महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रताप पॅटर्न मध्ये प्रवेश देखील घेऊन दिला होता. मात्र जयेशच्या या एका निर्णयाने आज आई वडिलांची म्हातारपणाची काठी, त्यांचे स्वप्न देखील त्याच धार तलावाच्या पाण्यात वाहून गेलेत….