मोदी शाह हे व्यापारी महाराष्ट्र लुटत आहेत खासदार संजय राऊत यांची टीका
अमळनेर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात खा. संजय राऊत यांची उपस्थिती…
अमळनेर : येथे शुक्रवारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला खासदार संजय राऊत उपस्थित होते. त्यांनी यावेळी अनेक जणांवर आपली तोफ डागत आपल्या भाषणास सुरुवात केली.
विधानसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर राज्यात आघाडीने प्रचार दौरे सुरू केल्याने आखा महाराष्ट्र राजकीय दृष्टीने ढवळून निघाला आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या प्रचाराच्या तोफा डागल्या जात आहे.यात मात्र सर्व सामान्यांच्या प्रश्नाला बगल देण्यात येत आहे.प्रत्येक पक्ष लाभाच्या योजना वर्षाव करताना पाहायला मिळते.
अमळनेर येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शहरातील मराठा मंगल कार्यालयात शिवसेनेचे वरिष्ठ नेते मा खासदार संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी संबोधित करताना सांगितले की,मेळाव्याला उपस्थित लाडक्या बहिणी या पन्नास खोके घेणाऱ्याचा विरोध करण्यासाठी जमले आहे, मंत्री अनिल पाटील यांचे बाबत बोलले की इथला आमदार लाचार व लोचट आहे, हा शरद पवारांच्या मागे पुढे धावत होता, अमळनेर हे तुळशी वृंदावन सारखे असून या मध्ये हा आमदार धांडा रुपी उपजला, मात्र सर्व आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी एक ही गद्दार विधानसभेत दिसणार नाही या करीता तयार राहावे, मोदी व शहा हे गुजरात चे दोन व्यापारी महाराष्ट्राला लुटत आहेत, उद्योग गुजरात ला घेऊन जात आहे, शरद पवारांच्या झेड सिक्युरिटी सुरक्षे बाबत बोलताना सांगितले की केंद्राची सुरक्षा म्हणजे महाराष्ट्रचे पोलिस कुचकामी असल्याचे सिद्ध होते.यामुळे फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. फडणवीस हा आगलाव्या माणूस आहे, मराठ्यांचे शिवराज्य ज्या पेशव्यांनी बुडविले त्याचे ते वंशज आहेत,मुलीनं सह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्र राज्यात सात दिवसात अकरा बलात्कार झाले, याचे खापर निर्लज्ज गृहमंत्री व मुख्यमंत्री विरोधकांवर फोडत आहे, बदलापूर मधील अल्पवयीन मुलींवर बलात्कार होऊन तब्बल बारा दिवस उलटून ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चा मुलगा श्रीकांत शिंदे जो त्या लोकसभेचा खासदार असूनही गेले नाही,मोदी शहा हे महाराष्ट्रात बाळासाहेबांना वंदन करण्याचे नाटक फक्त नाटक करतात व त्यांचाच पक्ष फोडतात, निवडणूक आयोग दबावात काम करीत आहे, शिवसेना स्थापने वेळी एकनाथ शिंदे फक्त चार वर्षांचे होते. आम्ही या बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे मात्र लोकसभेची निवडणूक झाली व आता विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असतांनाही सुप्रीम कोर्ट वेळखाऊपणा करीत आहे, जर सुप्रीम कोर्टाला न्याय देता येत नसेल तर टाळा लावा, अश्या आशयाचे खळबळ जनक वक्तव्य केले.लोकसभेत भाजपा चारशे पार आली असती तर संविधान जाळून टाकले असते मात्र त्याला ब्रेक महाराष्ट्र ने लावला, महाराष्ट्रात रोजगार नाही, मुंबईची अवस्था भिकारी केली, मोदी शहा राज्यकर्ते नसून क्रूर व्यापारी आहेत. यांना राजकीय सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीच्या लोकांनी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले.
सदर मेळाव्यास शिवसैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आघाडीतील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत सुर्यवंशी, के. डी पाटील, मनोज पाटील, संदीप घोरपडे तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, प्रदेश सरचिटणीस तथा वरिष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.