अंतुर्ली – रंजाणे वी.का.सोसायटी चेअरमन पदी शिवाजी दाजभाऊ पाटील बिनविरोध….
तर व्हॉईस चेअरमन पदी विमलबाई पाटील
अमळनेर : तालुक्यातील अंतुर्ली – रंजाणे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेरमन पदी नुकतीच शिवाजी दाजभाऊ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमन पदी विमलबाई पाटील यांची निवड करण्यात आली. शिवाजी पाटील यांचे नाव संस्थेचे संचालक सचिन पाटील यांनी सुचवले, तर छोटू नीलकंठ पाटील यांनी अनुमोदन दिले.
तसेच व्हॉईस चेअरमन पदासाठी सौ. विमलबाई रामदास पाटील यांचे नाव आबा वाल्मीक पाटील यांनी सुचवले तर सुभाष वामन सोनवणे यांनी अनुमोदन दिले.
सदर निवडणूक सब रजिस्टर कार्यालयाचे एस. पी. महाजन यांच्या अध्यक्षतेत पर पडली तर संस्थेचे सचिव कृष्णकांत भावसार यांनी निवडणूक कामत सहकार्य केले .
सदर सभेस सचिन पाटील, छोटू पाटील , सुभाष सोनवणे, देवदास पवार , विमल पाटील , मालती पाटील, किशोर पाटील, आबा पाटील ,भास्कर सोनवणे , नारायण पाटील आदी उपस्थित होते.
सदर निवडी बद्दल मंत्री अनिल पाटील, जयश्री पाटील , भागवत पाटील , अनिल शिसोदे , एल. टी .नाना , हिरालाल पाटील , राहुल पाटील , सुरेश पाटील, भोजमल पाटील आदींनी अभिनंदन केले.