जवखेडा बलात्कारातील आरोपीस अटक
जळगाव सब जेलमध्ये रवानगी

अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मूकबधिर असलेल्या 12 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाला असल्याचा गुन्हा अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीस काल शुक्रवारी अमळनेर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सदरील आरोपीचे वय पाहता त्याला पोलीस कोठडी राखीव ठेवत न्यायालयीन कोठडीत जळगाव सब जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
