कधीकाळी पोलीस ठाणे सांभाळणाऱ्या ठाणेदारावर त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
पैशांची मागणी करून गुन्हा दाखल न करणे भोवले… तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक खलाने व इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
अमळनेर : ज्या पोलीस ठाण्यात ठाणेदारी केली त्याच पोलीस ठाण्यात तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांची मागणी करून गुन्हा दाखल करून न घेणे मारवड येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे व इतरांना भोवले असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की एकलहरे येथील माजी सैनिक फत्तेलाल अर्जुन पाटील यांना व भाऊबंदकीतील लोकांना गावातील तानाजी पंढरीनाथ वाघ याने अश्लिल शिवीगाळ , मारून टाकण्याची धमकी, ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तुम्ही मला ग्रामपंचायत च्या जागेत मंदिरा शेजारी घरकुल बांधण्यास विरोध करत आहेत तुम्हाला मी आज सोडणार नाही असे म्हणून मोठमोठ्याने गावात ओरडत दहशत निर्माण करीत असल्याने फत्तेलाल पाटील हे इतर भाऊबंदीचे लोकांना घेऊन मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आले असता तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, व त्यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी देखील फिर्याद देण्यासाठी जाऊन देखील फिर्याद न घेता सहा पोलीस निरीक्षक खलाणे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी केली पैसे दिले नाही म्हणून खोटा बनाव करून तानाजी वाघ यास बोलऊन घेऊन त्याची फिर्याद घेऊन वरिष्ठ अधिकारी यांची दिशाभूल करून खोटा बनावट गुन्हा दाखल केला व तात्काळ अटक केली आणि फत्तेलाल पाटील यांची फिर्याद न घेता पोलीस स्टेशनमध्ये डाबून ठेवले.सदर बाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील त्यांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले शेवटी त्यांनी न्यायालयात दाद मागितल्याने त्यांना न्यायालया कडून दिलासा मिळाला असून न्यायालयाने सीआरपीसी 156 (3) प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारवड यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देऊन तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अमळनेर यांना आदेशित केले आहे.
वरील फिर्याद वरून मारवड पोलीस स्टेशन मध्ये वरील संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.