खा. सुप्रिया सुळे आज अमळनेरात
कृषिभूषण पाटील यांच्या आजच्या भूमिकेवर लक्ष
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज अमळनेर विधानसभा मतदार संघात येणार असून त्या आज महिला – विद्यार्थी – शेतकरी – कष्टकरी – व्यवसायिकांशी संवाद साधणार आहेत.
आज शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे कार्यक्रम संपन्न होईल. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील , मा. विधानसभा अध्यक्ष अरूनभाई गुजराथी , मा.पालकमंत्री सतिष पाटील , गुलाबराव देवकर , रविंद्र भैया पाटील , महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी हे देखील उपस्थित राहणार असून अमळनेर विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट नाकारणारे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार असल्याचे सांगितले जात होते. तर आजच्या ह्या कार्यक्रमास कृषिभूषण पाटील उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.