सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी…
- दौऱ्यादरम्यान निदर्शने होण्याची शक्यता
अमळनेर : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रीया सुळे यांच्या दौऱ्याआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दुफळी निर्माण झाल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्या दरम्यान पोस्टर लावून निदर्शने होण्याची शक्यता आहे.
कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी ही दुफळी निर्माण झाल्याचे समजते. एका गटाचे म्हणणे आहे की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अमळनेरची जागा जिंकायची असेल तर तगडा उमेदवार देणे गरजेचे आहे. म्हणून कृषिभूषण पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी उत्तम उमेदवार आहेत. तर एका गटाचे म्हणणे आहे की, साहेबराव पाटील हे एकनिष्ठ नसून अनेक पक्षांमध्ये त्यांची भ्रमंती झालेली आहे. म्हणून अशा विषयांवर ही दुफळी निर्माण झाल्याची माहिती आहे.
मी तालुकाध्यक्ष असून आज खासदार सुप्रिया सुळे यांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. मात्र या कार्यक्रमा दरम्यान माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केले जात आहेत. जे लोक मंत्री अनिल पाटलांकडे वेळोवेळी जात असतात ते एकनिष्ठता शिकवत आहेत. अमळनेर मतदार संघाची जागा निवडून आणायची असेल तर यासाठी कृषिभूषण पाटील हे योग्य व जनतेत मेरिटचे उमेदवार आहेत.
सचिन पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
सध्या आमचं सगळं लक्ष कार्यक्रमावर असून या बाबतीत नंतर बोलू… No Comments
तिलोत्तमा पाटील – नेत्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार